Nashik Air Show
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकचा प्रचार व प्रसार, तसेच पर्यटनवाढीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नाशिक फेस्टिव्हल भरविण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलअंतर्गत २३ जानेवारीला गंगापूर धरण परिसरात भारतीय हवाई दल कसरती (एअर शो) आयोजित केले आहे. हवाई दलाच्या सूर्यकिरण ॲरोबिक्स पथकाकडून सकाळी १० ते १२ यावेळेत हवाई कसरतींचे सादरीकरण केले जाणार आहे.