वणी- चैत्र उत्सव बहरला... भक्त मेळा सजला, जगदंबा साजिरी उभी शिखराला.. झेंडा आतुर मान पर्वताला, आई सप्तशृंगी नाम मनुजु आणखी काय जीवनाला..,’ ‘सप्तशृंगी देवी माता, चरणी ठाव देई आता.., सप्तशृंगी देवी माता, पायाशी जागा देई आता’ अशी स्तुतिसुमने गाऊन शेकडो मैलांवरून आग ओकणाऱ्या उष्णतेची तमा न बाळगता सप्तशृंगगडावर दाखल झालेले सुमारे दीड लाखावर भाविक आदिमातेच्या चरणी लीन झाले.