Latest Marathi News | प्लास्टिक जप्त करत 30 हजाराची दंड वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic Seized

Nashik : प्लास्टिक जप्त करत 30 हजाराची दंड वसुली

नाशिक : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या पंचवटीतील सहा व्यावसायिकांवर कारवाई करत तब्बल तीस हजार रुपयांची दंडवसुली केली. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या पाच नागरिकांकडूनही तीन हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली. (fine of 30 thousand was recovered plastic seized at panchavati Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik :...अन् सजगतेने 'त्यांनी' वाचविला घोरपडीचा जीव

शनिवारी (ता. १५) मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने व संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राबडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, उदय वसावे, स्वच्छता निरीक्षक दुर्गादास मालेकर, किरण मारू, दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन विभाग पथकामार्फत विविध ठिकाणी पाहणी दरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक बॅग्स, प्लास्टिक लेपित डिश, प्लॅस्टिक ग्लास वापर करताना आढळून आल्याने पहिला गुन्हा रुपये पाच हजार रुपयांप्रमाणे सहा व्यावसायिकांना तीस हजार रुपये दंड करून ११ किलो प्लॅस्टिकही जप्त करण्यात आले आहे. सदर मोहीम यापुढेही नागरिकांचे प्रबोधन करून सुरुच राहणार असल्याचे संजय दराडे यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; कारचालकाला अटक