Fire, Medical department Recruitment : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रिया होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recruitment

Fire, Medical department Recruitment : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रिया होणार सुरू

नाशिक : अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेचा एकमेव प्रस्ताव सादर झाल्याने याच संस्थेमार्फत भरती केली जाणार असून, साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होईल. (Fire and Medical department Recruitment process in first week of January Nashik News)

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही.

मात्र, राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Rajya Natya Spardha : ‘ये मामला फिरसे गडबड है’तून प्रेक्षकांना हसविण्याचा धाडसी प्रयत्न!

त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला नाही. त्यामुळे आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

"अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला असून, यामार्फतच भरती प्रक्रिया राबविली जाईल."
- मनोज घोडे- पाटील, उपायुक्त, प्रशासन.

हेही वाचा: Police Transfer : विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली रद्द!