सटाणा - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सत्यम इलेक्ट्रिकल्सच्या गोदामाला आज सोमवार (ता.१४) दुपारी आग लागल्याने सर्व इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले. काही वेळातच आगीने रौद्र रुप घेतल्याने मोठे नुकसान झाले. वर्षभरात शहरातील दुकानांना आग लागण्याची ही चौथी घटना आहे.