पंचवटी- भरदुपारी अचानक सायरन वाजला आणि पोलिसांचा ताफा, अग्निशमन दलाच्या गाड्या व रुग्णवाहिकांचे ‘सायरन’ वाजू लागतात. काहीतरी घडल्याची जाणीव रामतीर्थावर जमलेल्या भाविकांना होते. इतक्यात धोक्याचा भोंगा वाजतो आणि रामतीर्थावर हवाई हल्ला झाल्याची उद्घोषणा होते. आता काय करायचे म्हणून घाबरतात. मात्र, हा हवाई हल्ला नसून मॉकड्रिल असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.