Crime
sakal
जुने नाशिक: सातपूर येथील ऑरा बार परिसरातील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील संशयित भूषण लोंढे, प्रिन्स सिंग यांच्या शहर गुन्हे शाखा युनिट २ पथकाने उत्तर प्रदेशात मुसक्या आवळल्यानंतर त्यांना ट्रान्झिट वॉरंटने गुरुवारी (ता. ४) रात्री घेऊन पथक शहरात दाखल झाले. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.