Latest Crime News | पैशांच्या देवाण- घेवाणवरून अंबड लिंकरोडवर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police on Location

Nashik Crime News : पैशांच्या देवाण- घेवाणवरून अंबड लिंकरोडवर गोळीबार

सिडको (जि. नाशिक) : अंबड लिंकरोडवरील संजीवनगरातील कबिला रेस्टॉरंटच्या समोर बुधवारी (ता.९) मध्यरात्री दोन नातेवाइकांमध्ये पैशांच्या देवाण- घेवाणवरून झालेल्या वादात पिस्तूलद्वारे हवेत गोळीबार केला गेला. पाच ते सहा राऊंड फायर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Firing on Ambad Link Road over exchange of money Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik | जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांना ‘अल्टिमेटम्‌’ : पोलीस अधीक्षक उमाप

या घटनेची माहिती समजताच नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे निरीक्षक आनंद वाघ यांसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेमुळे संजीवनगर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

हेही वाचा: Nashik Crime News : विनयभंग प्रकरणातील आरोपीला 6 वर्षांचा सश्रम कारावास