श्रावणाच्या पहिल्याच दिवशी गजबजली मंदिरे; बेलासह फुलांच्या मागणीत वाढ | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devotees at temples nashik News

श्रावणाच्या पहिल्याच दिवशी गजबजली मंदिरे; बेलासह फुलांच्या मागणीत वाढ

नाशिक : हिंदू धर्मीयांमध्ये मोठे धार्मिक महत्त्व असलेल्या श्रावणमासाला (Shravan) शुक्रवार (ता.२९) पासून प्रारंभ झाला. महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेकांनी देवदर्शन घेत महिनाभरातील संकल्पही केले.

दरम्यान, भगवान शंकराच्या प्रिय असलेल्या बेलासह अन्य फुलांच्या मागणीतही वाढ झाली. (first day of Shravan temples were crowded Increase in demand for flowers bell nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : मोलमजुरी करणाऱ्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती

हिंदू धर्मियांत श्रावण महिन्याला आगळेवेगळे महत्त्व आहे. या काळात अनेकजण सात्त्विक आहाराबरोबरच काही संकल्पही करतात. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून कपालेश्‍वर, श्री काळारामासह अन्य छोट्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

देवस्थानाकडूनही मंदिरांची साफसफाई करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रावण महिना म्हटले, की अनेकजण शिव शंकराचे जपतप करतात. तर तरुणांसह तरुणी आपल्या इच्छेच्या फलश्रृतीसाठी भगवान शंकराला बेल अर्पण करतात.

यात अकरा बेलापासून एक हजार एक बेल अर्पण करण्याचा संकल्प करतात. त्यामुळे बेलासह झेंडू, गुलाब, गुलछडी आदी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कालपर्यंत दहा रुपयांत असलेल्या मिक्स फुलांच्या वाट्याला दुप्पट पैसे म्हणजे वीस रुपये मोजावे लागले. बेलाच्या मागणी व दरांतही वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik : जिल्हा बँकेने ओलांडला 400 कोटींचा टप्पा

Web Title: First Day Of Shravan Temples Were Crowded Increase In Demand For Flowers Bell Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikTemplesshravan