धुळे ः टुडे १ साठी
--
सूचना ः फोटो पाठवित आहे...
--
अर्चना पाटलांवर धुळे शहराची धुरा
-
पहिल्या महिला पोलिस निरीक्षकपदी नियुक्तीचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : प्रशासकीय कारणांसह कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने जिल्हा पोलिस दलात फेरबदल करण्यात आले आहेत. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांची धुळे तालुका पोलिस ठाण्यात, तर नियंत्रण कक्षातील निरीक्षक अर्चना एस. पाटील यांची धुळे शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. त्या शहराच्या पहिल्या महिला पोलिस निरीक्षक ठरल्या आहेत.
जिल्हा विशेष शाखेतील निरीक्षक आर. एस. सुर्वे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक नीलेश मोरे यांची नरडाणा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाण्यात, तर नरडाणा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक सचिन कापडणीस यांची आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली आहे. धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांची नवापूर (जि. नंदुरबार) पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होऊन पदभार स्वीकारण्याचे निर्देशही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.