Yeola Marathi Sahitya Sammelan: येवल्यात शनिवारी, रविवारी पहिले मराठी साहित्य संमेलन

लेखक आपल्या भेटीला, प्रकट मुलाखत, पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलनाची मेजवानी
Vikram Gaikwad
Vikram Gaikwadesakal

येवला : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेतर्फे पहिले मराठी साहित्य संमेलन येत्या २५ व २६ नोव्हेंबरला होणार आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

यानिमित्त सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या येवल्यात सारस्वतांचा मेळा भरणार असून, दोन दिवस परिसंवाद, लेखक भेटीला, प्रकट मुलाखत, पुस्तक प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कवी संमेलन, कथाकथनाची मेजवानी मिळणार आहे. (First Marathi Sahitya Sammelan in Yeola on Saturday Sunday nashik)

शहरातील येमको बँक सभागृहात होणाऱ्या साहित्य संमेलनात शनिवारी (ता. २५) सकाळी दहाला पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते होईल.

तहसीलदार आबा महाजन, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, सेक्रेटरी डॉ. महेश्वर तगारे, मर्चंट्स बँकेचे अध्यक्ष विकर्णसिंग परदेशी, उपाध्यक्ष सुहास भांबरे प्रमुख पाहुणे राहतील.

दुसऱ्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी दोनपर्यंत ‘लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम होईल. प्रा. गो. तु. पाटील, विनोद बनकर प्रमुख पाहुणे राहतील.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आबा महाजन, प्रथितयश कवी उत्तम कोळगावकर, ज्येष्ठ कवयित्री नीरजा, नाटककार दत्ता पाटील, कवी प्रा. ऐश्वर्य पाटेकर, उर्दू, हिंदी साहित्यिक एम. मुबीन, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

तिसऱ्या सत्रात दुपारी तीनला कवी अटलबिहारी बाजपेयी काव्यकरंडक काव्य स्पर्धा होईल. माजी सभापती संभाजी पवार, रवींद्र जगताप, श्रीमती नीरजा, कवी पाटेकर उपस्थित राहतील.

रविवारी (ता. २६) सकाळी आठला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सारंग लुटे प्रमुख पाहुणे राहतील.

Vikram Gaikwad
Nashik: मोडी लिपीतील कुणबी नोंदी शोधण्यासाठी रात्रीचा-दिवस! जळगाव नेऊरचे शिक्षक यांनी शोधल्या सुमारे 2 हजार नोंदी

पहिल्या सत्रात सकाळी दहला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ कवी आणि साहित्य रेखाटनकार धनंजय गोवर्धने यांच्या हस्ते होईल.

संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे, स्वागताध्यक्ष तथा कवी विक्रम गायकवाड, कवी-गीतकार प्रकाश होळकर, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, कवी वाहरू सोनवणे, तहसीलदार महाजन, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, भांडगे पैठणीचे संचालक राजेश भांडगे उपस्थित राहतील.

दुसऱ्या सत्रात सकाळी दहाला प्रा. रंगनाथ पठारे यांची प्रकट मुलाखत प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, विक्रम गायकवाड घेणार आहेत. तिसऱ्या सत्रात दुपारी दोनला पुरस्कारप्राप्त कथाकार किरण वेताळ (पुणे), श्रीमती सुचित्रा पवार (तासगाव, जि. सांगली), श्रीमती मंगल कातकर (नवी मुंबई) यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होईल.

दीपक परदेशी प्रमुख पाहुणे राहतील. चौथ्या सत्रात राज्यस्तरीय कथा व कविता स्पर्धा आणि अटलबिहारी बाजपेयी काव्यकरंडक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल.

पाचव्या सत्रात दुपारी चारला निमंत्रितांचे काव्यसंमेलन वाहरू सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात प्रकाश होळकर, देविदास चौधरी, सुमती लांडे, ऐश्वर्य पाटेकर, अमोल बागूल, अशोक बनसोडे, कविता आत्राम, विष्णू थोरे, शपीक शेख, श्रीमती शर्मिला गोसावी, नानासाहेब बोरस्ते आदी निमंत्रीत कवींचा सहभाग राहील.

साहित्य पर्वणीचा साहित्यप्रेमी व रसिकांनी अस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष विक्रम गायकवाड, येथील साहित्य परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सस्कर, बाळासाहेब सोमासे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, शरद पाडवी, बाळासाहेब हिरे, योगेंद्र वाघ, माधव गंगापूरकर, लक्ष्मण बारहाते, सुवर्णा चव्हाण, निर्मला कुलकर्णी, सचिन साताळकर, शिवाजी भालेराव, नानासाहेब पटाईत,

दत्तकुमार उटावळे, डॉ. महेश्वर तगारे, अविनाश पाटील, राकेश गिरासे, संतोष विंचू, सुनील गायकवाड, अरुण भावसार, विनोद घोलप, रतन पिंगट, सुमन नागपुरे, मंगला अहिरे, राजू पवार, जय माळोकार, सुकृत पाटील, बाजीराव सोनवणे, प्रकाश विधाते, प्रमोद आंबेकर, शंकर अहिरे, प्रशांत उदावंत, भगवान चित्ते, बापूसाहेब पगारे, राजेंद्र भावसार, डॉ. सुरेश कांबळे, राहुल गुजराथी, मुश्रीफ शहा आदींनी केले आहे.

Vikram Gaikwad
Local Bodies Election: निवडणुका लांबल्याने इच्छुकांची कोंडी! जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेवर प्रशासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com