रविवारी म्हसदीत धनदाईदेवीजवळ तालुकास्तरीय पहिला महिला मेळावा

रविवारी म्हसदीत धनदाईदेवीजवळ तालुकास्तरीय पहिला महिला मेळावा
Published on: 
म्हसदी येथे उद्या पहिला तालुकास्तरीय महिला मेळावा सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. ३० : समाजातील अनिष्ट प्रथा- परंपरांना मूठमाती देत, विवेक, संस्कारांची कास धरत, समाजाची खरी प्रगती ही विचारांमधील सकारात्मक परिवर्तनात घडविण्यासाठी रविवारी (ता. १) दुपारी दोनला मराठा सामाजिक परिषदेतर्फे येथील धनदाईमाता ट्रस्टच्या मंगल कार्यालयात तालुकास्तरीय पहिला महिला मेळावा होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. २६) ग्रामपंचायत कार्यालयात नियोजनासाठी बैठक झाली. अनिष्ट, कालबाह्य प्रथा- परंपरांबाबत जनजागृती करणे, अंधश्रद्धेला आळा घालणे, महिलांमध्ये वैचारिक जागृती मेळाव्यात केली जाणार आहे. संगमनेर येथील लोकनेत्या, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील, धुळे येथील प्रा. डॉ. वैशाली पाटील मार्गदर्शन करतील, अशी माहिती मराठा परिषदेचे अध्यक्ष नामदेव पाटील, उपाध्यक्षा संजीवनी गांगुर्डे- पाटील, शोभना पाटील यांनी दिली. मेळाव्यासाठी साक्रीसह बागलाण तालुक्यातील सुमारे पंधराशे महिला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. या वेळी मराठा परिषदेचे अध्यक्ष नामदेव देसले, उपाध्यक्षा संजीवनी गांगुर्डे - पाटील, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव देवरे, उपाध्यक्ष गंगाराम देवरे, सचिव हिम्मतराव देवरे, ज्येष्ठ संचालक सुभाष देवरे, महेंद्र देवरे, बी. एम. भामरे, निवृत्त विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, मधुकरराव गांगुर्डे, दिलीप देवरे, रामराव ह्याळीस, सतीलाल महाराज, देवेंद्र देवरे, अविनाश देवरे, राज देवरे, भगवंत देवरे उपस्थित होते. बी. एम. भामरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.