नाशिक- शहर परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. शहरातून पुन्हा पाच दुचाकी चोरी झाल्या असून, यात पंचवटीतील तीन दुचाकींचाही समावेश आहे. चोरीमुळे वाहनमालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. तर पोलिसांकडूनही चोरट्यांना आळा घालण्यात अपयश आले आहे.