उत्तर महाराष्ट्रात ध्वजवितरण : 36 लाख 4 हजार 994 राष्ट्रध्वजांचे वितरण

Indian National Flag
Indian National Flagesakal

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर झेंडा’ उपक्रमात ३६ लाख ४६ हजार ३६३ इतकी असून या प्रत्येक घरांवर तिरंगा वितरित केले जाणार आहेत. (Flag distribution in North Maharashtra Distribution of 36 lakh 4 thousand 994 national flags nashik Latest Marathi news)

Indian National Flag
Nashik : नाशिकमध्ये 'एफडीए'ची मोठी कारवाई; 1 कोटींचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

विभागातील पाचही जिल्ह्यात ३६ लाख ४ हजार ९९४ इतके राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी १० लाख राष्ट्रध्वजांचे वितरण महापालिका व नगरपालिका क्षेत्रात ४ लाख २५ हजार २४० घरांची संख्या असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत.

तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या ५ लाख ७४ हजार ७६० इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर ७ लाख राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ३ लाख राष्ट्रध्वज पुरविण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेला २ लाख तर मालेगाव महापालिकेला १ लाख राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले आहेत.

Indian National Flag
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे नाशिकला उद्या साधणार संवाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com