ध्वजस्तंभ बोधचिन्हाचा वाद निरर्थक : थेेटे

ध्वजस्तंभ बोधचिन्हाचा वाद निरर्थक : थेेटे
Published on: 
ध्वजस्तंभ बोधचिन्हाचा वाद निरर्थक --- पुरोहित संघाचे अध्यक्ष थेटे यांची भूमिका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : कुशावर्त कुंड येथील सिंंहस्थ कुंभमेळा पताका व ध्वजस्तंभ हे स्वतंत्र विषय आहेत. या ध्वजस्तंभावर पुराेहित संघाचे नाव पूर्वीपासून नोंदविण्याची परंपरा आहे. पुरोहित संघाने यंदा बोधचिन्हाची अधिकृत नोंदणी केली असून, ध्वजस्तंंभावर त्याचा अंतर्भाव करण्यात आला. त्यामुळे या मुद्यावरून निर्माण करण्यात आलेला वाद निरर्थक आहे, अशी भूमिका त्र्यंबकेश्‍वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी मांडली. त्र्यंबकेश्‍वर मंदिर बंद ठेवून भाविकांना दर्शनापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्‍वर येथे उभारण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभावर पुरोहित संघाचे बोधचिन्ह वापरण्यात आले आहे. या बोधचिन्हावरून नव्या वादाला तोंड फुटले. पुरोहित संघाचे अध्यक्ष थेटे यांनी शुक्रवारी (ता. १६) या वादावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की ध्वजस्तंभ व सिंहस्थ पताका हे दोन्ही वेगळे विषय आहेत. ध्वजस्तंभावर समुद्रमंथनाची प्रतिकृती असून, समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या १४ रत्नांची उत्पत्ती दर्शविणारी चित्ररचना आहे. या स्तंभावर महाराष्ट्र शासनाचेही बोधचिन्ह आहे. पुरोहित संघाने यंदा अधिकृतरीत्या बोधचिन्हाची नोंदणी करून घेतल्याने नावाऐवजी त्याचा समावेश करण्यात आल्याचे थेटे यांनी स्पष्ट केले; तर मूळ पताकावर मगरीची प्रतिमा, सूर्यनारायण, गुरू आणि सिंह अशी कुंभमेळ्याशी संबंधित पारंपरिक प्रतीके आहेत. या प्रतीकांमध्ये कोणतीही नवीन परंपरा आणली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. पुरोहित संघाने ध्वजस्तंभ सोहळ्यावर पूर्णपणे नियंत्रण राखल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना कुशावर्त येथे परंपरेनुसार गंगापुत्र मंडळ व नाविक समाजालाही महत्त्वाचे स्थान असून, त्यांच्यासह सर्व संबंधित परंपरांचा मान राखल्याचे थेटे यांनी स्पष्ट केले. मंदिरावर गावाचे अर्थकारण : थेटे त्र्यंबकेश्‍वर मंदिरावर गावाचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे सिंहस्थ कामांसाठी मंदिर बंद ठेवणे हा निर्णय योग्य नसल्याचे मत मनोज थेटे यांनी व्यक्त केले. भाविकांच्या येण्या-जाण्याचे नियोजन, वेळेचे नियमन व गर्दीवर नियंत्रण ठेवल्यास मंदिर बंद ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच, भाविकांना दर्शनापासून वंचित न ठेवता विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पुरोहित संघ आणि देवस्थान ट्रस्टला आवश्यक मनुष्यबळ व सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुंभमेळा बदनाम करण्याचे षडयंत्र : महाजन सिंहस्थ ध्वजस्तंभ पूजन सोहळा परंपरेनुसार पार पडला. या ध्वजस्तंभावरील बोधचिन्हाबाबत अजूनही आमच्याकडे कोणतीच तक्रार प्राप्त झालेली नाही. उलट असा वाद निर्माण करीत कुंभमेळा बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केला. सिंहस्थ नियोजनात सर्वांना योग्य तो मान दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व १३ आखाड्यांना ध्वजारोहणाचे आमंत्रण देण्यात येईल, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com