Nashik News: आदिवासी पाड्यांवरील गळक्या घरांना फ्लेक्स; ‘क्रेडाई’ची संकल्पना

President Krunal Patil gifting flex used on tribal padas by CREDAI Nashik Metro
President Krunal Patil gifting flex used on tribal padas by CREDAI Nashik Metroesak

Nashik News : बांधकाम व्यवसायिकांच्या क्रेडाई संघटनेतर्फे आदिवासी पाड्यांवरील गळक्या घरांना ठिगळ लावण्याची अभिनव संकल्पना अमलात आणण्यात आली आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरातीसाठी अविघटनशील प्लॅस्टिकचा वापर होतो.

जाहिरातीचा उद्देश संपुष्टात आल्यानंतर ते फ्लेकस पडून राहण्यापेक्षा आदिवासी पाड्यांवरील गळक्या घरांना वाटप करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. (Flex poor houses on tribal padas Concept of Credai Nashik News)

क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. संस्थेतर्फे अनेक प्रदर्शन तसेच विविध उपक्रमांचे नियमितरीत्या आयोजन केले जाते. तो कार्यक्रम संपला की फ्लेक्स संदर्भात काय करायचे, असा प्रश्न पडतो.

पावसाळ्यामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये असणाऱ्या अनेक घरात पावसाचे पाणी येते. या घरांवर व तेथील झोपड्यांवर हे फ्लेकस टाकले तर पाणी गळणार नाही. त्यामुळे पाच हजार स्क्वेअर फूट फ्लेकस पासून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.

आगामी कालावधीमध्ये सुमारे पन्नास हजार स्क्वेअर फूट फ्लेकस वाटप केले जाणार आहे. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न असलेल्या जनजाती कल्याण आश्रम या समाजसेवी संस्थेची मदत त्यासाठी घेण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

President Krunal Patil gifting flex used on tribal padas by CREDAI Nashik Metro
Nashik News : दिव्यांगांसाठी खुशखबर! जिल्ह्यात दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव; जाणून घ्या सविस्तर...

या उपक्रमांतर्गत क्रेडाई सदस्य स्वखर्चाने विविध आदिवासी पाड्यात जाऊन फ्लेकस देणार आहे. या उपक्रमाने पावसाळ्यात आदिवासींच्या घरामध्ये पाणी गळणार नाही.

उपक्रमासाठी क्रेडाईचे राष्ट्रीय सल्लागार समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाई रिअल इस्टेट डेव्हलपमेंट ॲकॅडमीचे प्रमुख अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल मार्गदर्शन करत आहे.

उपक्रम यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर, सहसचिव सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, कमिटी मेंबर निरंजन शहा, सदस्य सुजित जाजू व जनजाती कल्याण आश्रमाचे सुनील सावंत, संजीव धोपरकर, धनंजय जामदार, लक्ष्मण टोपले, नानाजी देवरे, दीपा ब्रह्मेचा विशेष परिश्रम घेत आहे.

President Krunal Patil gifting flex used on tribal padas by CREDAI Nashik Metro
Nashik News: रिंगरोडचे ‘सिंहस्थ परिक्रमा मार्ग’ नामकरण; पुण्याच्या मोनार्च संस्थेकडून सर्वेक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com