Nashik News: ऑनलाइन मतदार नोंदणीत अडचणींचा पूर! शिक्षक संघटनांची बीएलओ कामाबद्दल नाराजी

A teacher during a door-to-door voter registration at Chinchohol (T.Triambakeshwar).
A teacher during a door-to-door voter registration at Chinchohol (T.Triambakeshwar).esakal

Nashik News : ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीत अनंत अडचणी येत असल्याने बीएलओ वैतागले आहेत.

जनगणना व प्रत्यक्ष निवडणुकी शिवाय इतर कुठल्याही कामात शिक्षकांची नेमणूक करण्यात येऊ नये असा शिक्षणाचा अधिकार अधिनियमात स्पष्ट उल्लेख असताना 'बीएलओ' म्हणून मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडे हे काम दिल्याने शिक्षक संघटनानी बीएलओच्या कामाबद्दल नाराजीचा सूर आळवला आहे. (Flood of difficulties in online voter registration Teachers unions are unhappy about BLO work Nashik News)

शैक्षणिक सत्राच्या महत्त्वाच्या कालावधीत शाळा बाह्य कामामुळे शिक्षक मेटाकुटीला आले आहे. जिल्ह्यात ४ हजार ७२४ बीएलओ मतदार नोंदणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

सातत्याने वेगवेगळ्या चाचण्या नवनवीन प्रयोग यामुळे मुलांना शिकवायचे तरी कधी? असा संतप्त सवाल शिक्षकांमधून व्यक्त होऊ लागला आहे.

गाव खेड्यातील नेटवर्क समस्या, सर्व्हर जॅममुळे तासन्‌तास बसून राहावे लागत असल्याने मतदारच कंटाळत असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहे.

त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने एक व दोन शिक्षकी शाळेतील गुरूजींची सर्व कामकाज करून बीएलओ व शालाबाह्य काम करत अध्यापन करताना प्रचंड कसरत होऊ लागली आहे.

ॲप हाताळणीस क्लिष्ट

मतदार नोंदणीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या बीएलओ यांना विशेष ॲप देण्यात आले आहे. मात्र हे ॲप हाताळणीस क्लिष्ट असल्याने एकच काम अनेक वेळा करावे लागत आहे. आदिवासी व दुर्गम भागात तर अनेक शिक्षक बीएलओ यांना ऑफलाइन फॉर्म भरून पुन्हा इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी जाऊन ते अपलोड करावे लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A teacher during a door-to-door voter registration at Chinchohol (T.Triambakeshwar).
Nashik: देशी वृक्षांच्या वाढीसाठी उद्यान विभागाकडून डिपॉझिट! पुढील वर्षासाठी NMC नर्सरीत तयार करणार 1 लाख रोपे

जिल्ह्यातील बीएलओंची संख्या

नाशिक पूर्व- ३१७

नाशिक मध्य - २९५

नाशिक पश्चिम - ३७९

देवळाली - २६८

सिन्नर- ३२१

निफाड -२७२

इगतपुरी-१५५

सुरगाणा -१६८

कळवण-१७३

दिंडोरी-२३७

पेठ-११२

नांदगाव -३२६

मालेगाव मध्य - ३४१

मालेगाव बाह्य - ३३१

येवला - ३१७

बागलाण -२८३

चांदवड -१८४

देवळा - ११२

त्र्यंबकेश्वर -१३३

"आधीच कमी शिक्षक त्यातच किचकट काम. आदिवासी दुर्गम भागात मतदार नोंदणीसाठी ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने काम करावे लागते. त्यामुळे अध्यापनावर परिणाम होत आहे."

- अविनाश भामरे, बीएलओ, चिंचओहोळ

"संघटना पातळीवर शाळाबाह्य कामाबद्दल कागदावर शासननिर्णय होतात. परंतु अंमलबजावणी होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. सारख्या अनेक कागदोपत्री कामापासून शिक्षक मुक्त करावा."

- अनिल जगताप. विभागीय उपाध्यक्ष,शिक्षक सेना.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षकांच्या मागे सातत्याने अशा कामांचा ससेमिरा लावून गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुरुजींना फक्त शिकवू द्या या एकाच विषयावर सर्व संघटनांनी एकत्रित रस्त्यावर उतरावे."

- सतीश मांडवडे, विभागीय कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

A teacher during a door-to-door voter registration at Chinchohol (T.Triambakeshwar).
DPC Fund: ZPच्या विकास निधीत 72 कोटींनी कपात! जिल्हा नियोजन समितीकडून वेळेत नियोजन न केल्याने कात्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com