दोन कोटींचा निधी

दोन कोटींचा निधी
Published on: 
पूरग्रस्तांसाठी दोन कोटींचा निधी राम भदाणे : चार हजार शेतकऱ्यांना दिलासा - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : धुळे तालुक्यातील जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून २ कोटी १० लाख ८७ हजार ३६० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याकामी पाठपुराव्यामुळे ही नुकसानभरपाई मंजूर झाली असून, यामुळे परिसरातील ३ हजार ९८४ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी पत्रकाव्दारे दिली. भदाणे म्हणाले, की मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील शेतीपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. कापूस, सोयाबीन, मका यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने तसेच काही भागांत शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले होते. पंचनामे होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. नंतर वस्तुनिष्ठ अहवाल शासनापुढे सादर झाला. त्यामुळे २ हजार ४५५ हेक्टर ८२ आर क्षेत्रासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही मदत थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा होणार आहे. या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यास मदत होणार असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचे आमदार भदाणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.