इंदिरानगर- वालदेवी नदीच्या पुरामुळे दाढेगाव-पाथर्डी पुलावरून दुचाकीसह वाहून जाणाऱ्या शिंगवे येथील सोमनाथ आचारी या युवकाला स्थानिक युवकांनी वाचवले. या घटनेमुळे पुन्हा एकदा हा पूल सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याची मागणी पाथर्डी, दाढेगाव आणि पिंपळगाव खांब येथील ग्रामस्थांनी केली आहे.