लखमापूर- जिल्ह्यात फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून, जिल्ह्यातील शेतकरी फूल उत्पादनात आघाडीवर आहेत. अत्याधुनिक फुलशेती करणारे हजारो शेतकरी आहेत, जे आपल्या शेतात विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतात. मात्र, कृत्रिम फुलांमुळे या फुलांच्या मागणीवर परिणाम होत आहे. शासनाने याबाबत धोरण ठरवून कृत्रिम फुलांवर बंदी आणावी व फुलशेतीला संरक्षण द्यावे, अशी मागणी तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांतर्फे जानोरी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.