धुक्यात कांदा पिके जगविण्यासाठी शेतकरी करताहेत जीवाचे रान

Onion farm
Onion farmesakal

जायखेडा (जि. नाशिक) : अवकाळी पावसामुळे पहाटेच्या वेळी दाट धुके व दवबिंदू पडत आहे. यामुळे लाल कांदा, उन्हाळी कांद्याच्या रोपांवर करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

धुके व दवबिंदूमुळे कांदा उत्पादक हैराण

बागलाण तालुक्यात नगदी पिक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणत: पोळ्यापासून या भागात कांदा लागवडीस प्रारंभ केला जातो. मात्र, लागवड केलेल्या कांद्याला या महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च केला. पण, अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. उंच व मुरमाड जमिनीत असलेला थोडाफार कांदा वाचला. मात्र, सध्या रात्री धुके व पहाटे दवबिंदू, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे त्यावर करप्याचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव काही दिवस असाच राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल तेथून महागडी कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे. मात्र, सध्या पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदापात पिवळी पडत आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढू लागला आहे.

Onion farm
उत्तर-पश्चिम, मध्य भारतात पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाची शक्यता

बैल बाजारात तेजी

अवकाळी पावसामुळे जमीन पूर्णपणे ओली झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती तयार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाऐवजी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. आधी संपूर्ण शेती ट्रॅक्टरद्वारे केली जायची. पण, अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बैलांना मागणी वाढली असून, बैल बाजार पुन्हा तेजीत आला आहे.

''ऑक्टोबर महिन्यात दोनवेळा कांद्याचे बियाणे टाकले. पण, मर रोगामुळे कांदा रोपे पातळे झाले. आता जे काही पिक उरले आहे ते धुके व दवबिंदूमुळे नुकसान होत आहे.'' - उद्धव जगताप, शेतकरी, जायखेडा

Onion farm
मिक्स लसीच्या डोसमुळे ओमिक्रॉनचा धोका टळेल? एका स्टडीतून खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com