NSK26H32110
जळगाव : ला. ना. विद्यालयात आयोजित लोककला प्रशिक्षण शिबिरात कला सादर करताना कलावंत.
–––
लोककला प्रशिक्षण शिबिरातून लोकपरंपरेचा जागर
----
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सादरीकरणातून ओळख व्हावी. तसेच पारंपरिक कला- संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या हेतूने ला. ना. विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर पार पडले.
या शिबिरामध्ये खानदेशातील लोककलेचे अभ्यासक व लोककलावंत शाहीर विनोद ढगे, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, उपाध्यक्ष पंकज बारी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता हर्षल पवार, अवधूत दलाल, गजानन साळुंखे, शालिग्राम रेणुके, विलास दलाल यांनी आकर्षक वेशभूषा करून शाहिरी पोवाडा, गोंधळ, भारुड, पारंपरिक लोकगीते व विविध लोककलांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ढोलकी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या साथीने कलावंतांकडून लोकपरंपरेचा जागर विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाला. उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन लोककला व लोकपरंपरेची माहिती जाणून घेतली. मनीषा पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर यामिनी चौधरी यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, पर्यवेक्षक रमा तारे, जगदीश साळुंखे, उल्हास ठाकरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
–––––––––––