नाशिक- अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शासनाच्या १०० दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत तीन हजारांहून अधिक अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. यात हॉटेल व्यावसायिक, रेशन बचतगट, मिठाई विक्रेते अशा विविध व्यावसायिक व सेवाभावी संस्थांचा समावेश आहे. बरोबर बचतगट किचन असलेल्या संस्थांना हायजीन रेटिंग गुणवत्ता मानांकन देण्यात आले आहे.