
आषाढीवारीसाठी निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी मुरंबीची बैलजोडी ठरली मानकरी
अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : कोरोना (corona period) कालखंडामुळे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्रांतील यात्रा व पालखी सोहळे शासकीय निर्बंधांमुळे पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील कोरोना महामारी आटोक्यात आली असून महाराष्ट्रांतील बहुतेक मुख्य तिर्थक्षेत्रातील यात्राउत्सव (Pilgrimage Festival), पालखी सोहळे (Palanquin Ceremony) हे आता पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरु झाले आहे. यांच पाश्र्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथून विश्वगुरू श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानतर्फे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघणाऱ्या पालखी सोहळा रथाचे सारथ्य करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील गजीराम पुंजा मते यांच्या देखण्या खिल्लारी बैल जोडीची निवड झाली आहे. जेष्ठ पौर्णिमेला १३ जुन रोजी विधीवत महापुजा झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे. (for Ashadhivari Nivruttinaths palanquin of murambi bulls pair Nashik News)
श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानतर्फे दरवर्षी आषाढी वारीनिमित्त त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर भव्य पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात येत असतो.यासाठी संस्थानकडुन जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून सुद्दढ,आकर्षक ,देखण्या बैल जोडीची निवड केली जात असते.यासाठी आकर्षक बैल जोडी असणारे शेतकरी पशुपालक संस्थानकडे बैलांची संपूर्ण माहिती, फोटो यासह अर्ज दाखल करीत असतात.यातून संस्थान सक्षम पदाधिकाऱ्यांच्या पाहणीतून आकर्षक बलदंड अशी बैलजोडी निमयानुसार निवड प्रक्रिया करीत असतात.
गेली दोन वर्ष पंढरपूर सह राज्यातील मुख्य देवस्थानच्या यात्रा कोरोनामुळे शासनाने बंद केल्या होत्या.यंदा यात्रा ,पालखी सोहळे पुन्हा सुरू करण्यात आले असून कोरोनांनंतर होणाऱ्या पहिल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी इगतपुरी तालुक्यातील बैलजोडी रथाचे सारथ्य करण्याचे मानकरी ठरले आहेत.
हेही वाचा: Nashik : म्हाळदे घरकुल योजनेचे वाजले बारा
गजीराम मते व त्यांचा मुलगा गणेश मते यांच्या मालकीची ही बैलजोडी असुन संपूर्ण तालुक्यात खिल्लारी जोडी म्हणून प्रसिद्ध आहेत. या बैलजोडीच्या निवडीनंतर इगतपुरीच्या जोग महाराज भजनी मठाचे मठाधिपती माधव महाराज घुले, अशोक महाराज धांडे,समाधान महाराज वारुंगसे, मनोहर महाराज सायखेडे, माधव महाराज काजळे, आदींसह अखिल भारतीय वारकरी संप्रदाय इगतपुरी आणि जिल्ह्यातुन अनेक किर्तनकार ,वारकरी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
हेही वाचा: ‘आमदार आपल्या दारी’ मोहिमेचा पहिला टप्पा मनमाडपासून
" शेतकऱ्याच्या जीवनात बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व असते आमची बैलजोडी ही आमचा जीव की प्राण आहेत. आमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही त्यांना जपतो. आषाढीवारीसाठी निवृत्ती नाथांच्या पालखी सोहळ्यासाठी त्यांची निवड झाल्याचे समजल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही खरोखरच स्वतः ला भाग्यवान समजतो की त्र्यंबकरायाची सेवा करण्याची संधी बैलजोडीच्या माध्यमातून आम्हाला मिळाली.
- गजीराम मते,बैलजोडी मालक शेतकरी, मुरंबी.
Web Title: For Ashadhivari Nivruttinaths Palanquin Of Murambi Bulls Pair Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..