Nashik Crime : सातपूर हादरले! विवाहितेची दोन लाखांत विक्री करून लावला बळजबरीने विवाह
19-Year-Old Woman Allegedly Sold for ₹2 Lakh : सातपूर येथील एका १९ वर्षीय विवाहितेची फसवणूक करून तिला जातेगाव येथे विकल्याचा प्रकार उघडकीस आला असून, सातपूर पोलिसांनी तिला मोठ्या कसरतीने ताब्यात घेतले आहे.
नाशिक: सातपूर परिसरातील १९ वर्षीय विवाहितेला इव्हेंटच्या कामाला जायचे असल्याचे सांगत मालेगावमार्गे जातेगावला नेत तिची दोन लाखांत विक्री करत बळजबरीने विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.