Nashik News: द्राक्ष निर्यातीतून मिळाले 1 हजार 75 कोटींचे परकीय चलन; 2018-19 पेक्षा 3 हजार टनांनी कमी

grapes
grapesesakal

Nashik News : द्राक्ष पंढरी नाशिक जिल्ह्यात मार्च आणि एप्रिलमध्ये पावसाने ५ हजार २०८ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.

तरीही यंदा आतापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातून २० हजार ९५१ टनाने अधिक म्हणजेच, १ लाख ४३ हजार २८१ टन इतकी झाली आहे. त्यातून १ हजार ७४ कोटी ६० लाख रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

मात्र २०१८-१९ मध्ये १ लाख ४६ हजार ११३ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्याच्यातुलनेत आतापर्यंतची निर्यात २ हजार ८३२ टनाने कमी झाल्याचे दिसते. (Foreign exchange of 1 thousand 75 crores received from grape export 3 thousand tonnes less than 2018 19 Nashik News)

जिल्ह्यात द्राक्षाखाली ६२ हजार ९८२ हेक्टर ७ आर क्षेत्र असून निफाड, दिंडोरी, नाशिक, चांदवड या तालुक्यात द्राक्षांची लागवड मोठ्याप्रमाणात करण्यात आलेली आहे. निर्यातक्षम द्राक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने ट्रेसीब्लिटी नेटद्वारे द्राक्ष नोंदणीसाठी २०२१-२२ मध्ये ४४ हजार ६०० शेतकऱ्यांचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्‍चित केले होते.

प्रत्यक्षात ३४ हजार २९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ३१ हजार ८११ शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली आहे. म्हणजेच, काय तर निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.

निर्यातक्षम द्राक्षांचे थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका, तास-ए-गणेश हे हिरवे, तर शरद सीडलेस, क्रिमसन सीडलेस, फ्लेम सीडलेस, रेड ग्लोब, मेडिका हे रंगीत वाण आहेत.

युरोपसह इतरत्र निर्यातीत वृद्धी

द्राक्षांची जिल्ह्यातून युरोपसह इतर देशांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीमध्ये वृद्धी झाली आहे. २०२१-२२ मध्ये युरोपियन देशांमध्ये ९३ हजार ५७९, तर युरोपच्या व्यतिरिक्तच्या देशांमध्ये २८ हजार ७५१ टन अशी एकूण १ लाख २२ हजार ३३० टन द्राक्षांची निर्यात झाली होती.

यंदा आतापर्यंत युरोपियन देशांमध्ये १ लाख ५ हजार ३००, युरोप व्यतिरिक्त देशात ३७ हजार ९८२ अशी द्राक्ष निर्यात झाली. युरोपियन देशांमध्ये प्रामुख्याने नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, इंग्लंडमध्ये, तर ‘नॉन युरोप'मधील रशिया, अरब अमिराती, कॅनडा, तुर्की, चीनमध्ये यंदा आतापर्यंत द्राक्षांची निर्यात झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

grapes
Sinnar Market Committee : सिन्नर बाजार समितीसाठी मतदान केंद्रांची निश्‍चिती

मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातून एकूण झालेली द्राक्ष निर्यात टनामध्ये याप्रमाणे : २०१९-२० : १ लाख १६ हजार ७६७, २०२०-२१ : १ लाख २६ हजार ९१२. कृषी विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्राचा द्राक्ष निर्यातीत देशात पहिल्या क्रमांक असून द्राक्ष निर्यातीपैकी ९१ टक्के निर्यात ही नाशिक जिल्ह्यातून होते.

पाच ते दहा हजार टनापर्यंत इतर जिल्ह्यातील द्राक्षे शक्य

नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचे अवकाळी पाऊस, अतिपाऊस, जोरदार वारे, गारपिटीमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत अधिकची निर्यात झाली कशी? असा प्रश्‍न द्राक्ष उत्पादकांमधून उपस्थित केला जात आहे.

एवढेच नव्हे, तर निर्यातदारांनी सांगली, सोलापूर, लातूर भागातील द्राक्षे नाशिक जिल्ह्यातील प्रिकुलींग-कोल्ड स्टोअरेजमध्ये आणून ठेवत इथून निर्यात केल्याची साशंकता शेतकऱ्यांमध्ये आहे.

शेतकऱ्यांच्या या शंकांच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर सुपर मार्केटसाठी कदाचित, पाच ते दहा हजार टनापर्यंत द्राक्षे इतर जिल्ह्यातील पाठवण्याची शक्यता वर्तवली.

मात्र यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षांचे घेतलेले गुणवत्तापूर्ण उत्पादन, युरोपसह इतर देशांमध्ये द्राक्षांना राहिलेली चांगली मागणी या कारणांमुळे निर्यात वृद्धी झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. युक्रेन युद्धाला विराम मिळाला असता, तर कदाचित रशियामध्ये आणखी निर्यात वाढणे शक्य होते, असेही अधिकारी सांगतात.

grapes
Nashik : कृषी पंढरीत एप्रिलमध्ये अवकाळीने झोडपले 43 हजार हेक्टर क्षेत्र; सर्वाधिक कांदा-द्राक्षांचे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com