Telecom Project
sakal
नाशिक: जिल्ह्यातील दहिवेल ते वणी रस्त्यालगत दूरसंचार सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने ०.८६३५ हेक्टर वनजमिनीच्या पुनर्वापरास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. व्होडाफोन आयडिया टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीस ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्व नाशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.