महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणेंचे निधन

Sadhna Torne
Sadhna Torneesakal

नाशिक : नाशिक जिल्हा महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा सौ. साधना सुधाकर तोरणे (८१) यांचे आज रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. साधनाताई डबल एमए, बीएड, ज्योतिषशास्त्री, डेफ अँड डंबची पदवी अशा उच्च विद्याविभूषित विदुषी होत्या. मुंबई, पुण्यात अनेक वर्ष मराठीच्या प्राध्यापिका होत्या. पुणे, नाशिक येथील विविध समाजसेवी संस्थामध्ये त्या पदाधिकारी होत्या. तेजस्विनी महिला संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.

महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी असताना संस्थेला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजकार्यासाठी असलेला पुरस्कार मिळाला होता. सातत्याने वृत्तपत्रीय लेखन, बालनाट्यच्या दिग्दर्शिका, महिला सबलीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले होते. शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे निवृत्त संचालक सुधाकर तोरणे यांच्या त्या पत्नी तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या त्या मातोश्री होत.

Sadhna Torne
पद्मश्री ते अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार वाचा सिंधुताईंचा प्रवास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com