Nashik Bribe Crime : नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी केदार लाचलुचपतच्या ताब्यात

bribe case
bribe caseesakal

Nashik News : सिन्नर नगरपरिषदेचे मावळते मुख्याधिकारी संजय केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. (former chief of municipal council Kedar in custody of Anti Corruption bureau sinnar nashik bribe crime news)

येथील एका तालुका कृषी अधिकार्‍यास काल रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच  दुसरी घटनी घडल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.  

सिन्नर नगरपरिषदेचे मावळते मुख्याधिकारी संजय केदार दोन-तीन दिवसांपुर्वीच बदली झाली. त्यांच्याजागी नवीन मुख्याधिकारी देखील रुजू झाले आहेत. अशी परिस्थिती असताना बांधकाम व्यावसायिकाकडे बांधकाम मंजुरीच्या बदल्यात 5 हजारांची लाच मागितल्याच्या मोबाईलवरील संभाषणावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल (दि.22) दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास केदार यांच्या निवासस्थानी छापा टाकून ताब्यात घेतले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

bribe case
Jalgaon Bribe News : ‘महावितरण’च्या तंत्रज्ञासह पंटरला लाच घेताना पकडले

केदार यांनी मुख्याधिकारी असताना बांधकाम व्यवसायिकाची सहा महिन्यांपासून बांधकाम मंजुरीची फाईल अडवून ठेवली होती. केदार यांनी बांधकाम मंजुरीसाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. बांधकाम व्यावसायिकाशी यासंदर्भात मोबाईलवर झालेले संभाषणाच्या आधारे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पाच हजार रुपयांची लाच मागितल्यावरुन ताब्यात घेतल्याचे समजते.  

यासंदर्भात तीन ते चार दिवसांपासून मोबाईलवर सुरू असलेले संभाषण एसीबीने पुरावा म्हणून ग्राह्य धरत केदार यांना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यासोबतच केदार यांच्या शिवाजीनगरमधील निवासस्थानाची तपासणी देखील करण्यात आली असून काही तेथून काही बॅग ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. त्यानंतर केदार यांना शासकीय विश्रामगृहात आणून तेथे रात्री उशिरापर्यंत चौकशीचे काम सुरु होते.

bribe case
Nashik Bribe Crime : सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी गागरे लाच लुचपतच्या जाळ्यात; 50 हजारांची लाच घेताना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com