Latest Political News | माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांची NCPत पुन्हा घरवापसी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former Mayor Arun Patil while accepting the letter of NCP City President from former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal at yeola

Nashik Political News : माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांची NCPत पुन्हा घरवापसी!

नांदगाव (जि. नाशिक) : माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी निवड झाली. येवला येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज अरुण पाटील यांच्यासह माजी उपनगराध्यक्षा सीमा राजुळे यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी तर शेख हाजी फैजल उस्मान यांची अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी अशा नियुक्तीचे पत्रे आज देण्यात आली. (Former mayor Arun Patil rejoins to NCP again nashik Latest Political News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Water Supply Management : सिडको, पूर्व विभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद!; जाणुन घ्या

माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांनी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी बहाल करून ऐन निवडणुकीच्या टप्प्यात माजी आमदार पंकज भुजबळ यांनी साथ सोडल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी पक्षापासून दूर होण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त होते. मात्र अलिप्त राहताना त्यांनी अन्य पक्षात प्रवेश देखील केलेला नव्हता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी सुहास कांदे यांची उघडपणे पाठराखण केली.

मात्र शिवसेना प्रवेश टाळला होता. आज येवला येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा घरवापसीचा सोहळा संपन्न झाला. अरुण पाटील यांनी २०१८ मध्ये पक्षाच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा सोपविल्या नंतर माजी नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री यांच्याकडे पक्षाच्या शहर अध्यक्षपदाची सूत्रे होती. त्यांनी आपल्या शहरध्यक्षपदाचा राजीनामा स्थानिक सोशल मीडियावर व्हायरल करतांना प्रकृतीचे कारण पुढे केले असले, तरी त्यांच्या पुढील निर्णयाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

"झाले गेले विसरून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे संघटनात्मक काम वाढीला लावणार आहोत" - अरुण पाटील माजी नगराध्यक्ष

हेही वाचा: Nashik News : आजपासून नागपूर- शिर्डी दरम्यान 'समृद्धी' मार्गे बससेवा!