Market Committee Election : ZPचे माजी सदस्य बाजार समितीच्या रिंगणात; निवडणुका लांबल्याचा परिणाम

market committee elections
market committee electionsesakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माजी सदस्यांनी जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणूक रिंगणात उड्या घेत अर्ज दाखल केले आहेत.

त्यामुळे निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. आधीच शेतकऱ्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे, यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होत नसल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे माजी सदस्यदेखील उतरल्याने स्थानिक नेत्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. (Former members of ZP in Market Committee Election arena Consequences of delaying nashik news)

बाजार समित्यांची मुदत संपुष्टात येऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अनेक अडचणींनंतर या निवडणुका होत आहेत. यातच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकादेखील वर्ष उलटूनही लागलेल्या नाहीत.

ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा वाद न्यायालयात पोचला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माजी सदस्यांसह इच्छुकांकडून वर्षभरापासून तयारी सुरू आहे. मात्र, निवडणुका लांबल्याने इच्छुकांची कार्यकर्ते सांभळण्याची कसरत आहे.

लांबलेल्या बाजार समित्यांची निवडणूक लागल्याने या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले, तसेच निवडणूक लांबल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे माजी सदस्यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते बाजार समित्यांमध्ये यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी अर्ज दाखल करत निवडणुकांची तयारी केली आहे. यात प्रामुख्याने पिंपळगाव बसवंत बाजार समितीत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार यांनी अर्ज दाखल केला असून, माजी आमदार अनिल कदम, गोकुळ गिते यांच्या पॅनलमधून त्या उमेदवारी करणार, हे निश्चित मानले जात आहे.

याच बाजार समितीतून माजी सदस्य यतीन कदम यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर लासलगाव बाजार समितीत पुन्हा एकदा नशीब अजमावीत आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

market committee elections
Life In Balance : रंजले, गांजल्यांच्या मुखी पडो दोन घास! दिव्यांग, वयोवृद्धांना मोफत जेवण देणारे हॉटेल

येथूनच माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी सदस्य डी. के. जगताप रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषदेतील भाजपचे माजी गटनेते चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे पुन्हा एकदा बाजार समितीच्या रिंगणात उतरले आहेत.

येथूनच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी सभापती संजय बनकर येवला बाजार समितीत अर्ज दाखल केला आहे. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष माजी सभापती केदा आहेर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या धनश्री आहेर देवळा बाजार समितीच्या रिंगणात उतरले आहेत.

नाशिक बाजार समितीत माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी सदस्य भास्कर गावित, रूपाजंली माळेकर, विनायक माळेकर, दिलीप थेटे यांनी अर्ज दाखल करत रिंगणात उतरले आहेत. दिंडोरी बाजार समितीत माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, माजी सदस्य तथा मविप्रचे संचालक प्रवीण जाधव यांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

कळवण बाजार समितीत माजी सभापती रवींद्र देवरे रिंगणात उतरले आहेत. घोटी बाजार समितीत माजी सदस्य तथा मविप्रचे संचालक अॅड. संदीप गुळवे पुन्हा एकदा नशीब आजमावीत आहेत. यातील किती माजी सदस्य बाजार समितीत उमेदवारी करता, याकडे आता लक्ष लागले आहे.

market committee elections
Uddhav Thackeray Group : पंचवटीतील 100 तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश; शालिमार कार्यालयात प्रवेश सोहळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com