NCP शरद पवार गटाकडून नाशिक जिल्हा प्रभारीपदी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे | Former minister Prajakta Tanpure as Nashik district in charge from NCP Sharad Pawar faction Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

Nashik NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नाशिक जिल्हा प्रभारीपदी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) पक्षाकडून नाशिक जिल्ह्याचे प्रभारीपद माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आले. तनपुरे शुक्रवारी (ता. २२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पक्षाने तनपुरेवर टाकली आहे. (Former minister Prajakta Tanpure as Nashik district in charge from NCP Sharad Pawar faction Nashik News)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात आढावा घेण्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर तनपुरे बैठक घेणार आहे. बैठकीत संघटनात्मक विस्तारावर चर्चा केली जाणार आहे.

टॅग्स :NashikNCP