अटकेतील एक पुर्वाश्रमीचा पोलिस अधीकारी

अटकेतील एक पुर्वाश्रमीचा पोलिस अधीकारी
Published on: 
NSK26H34189 : शंकर जासक NSK26H34188 : गजानन पवार NSK26H34190 : पकडलेला संशयित NSK26H34191 : ग्रामस्थांनी पकडलेला संशयित ----- अटकेतील एक पूर्वाश्रमीचा पोलिस अधिकारी --- जळगाव स्टेट बँक दरोड्यात जामिनावर सुटला; कारागृहातच टोळी तयार करून आखला कट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : भोकर (ता. जळगाव) स्टेट बँकेत पिस्तुलाच्या धाकावर दरोडा टाकणारा दुसरा-तिसरा कोणी नसून तो स्वतः बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक आहे. २०२३ मध्ये कालिंका माता शाखेवर टाकलेल्या दरोड्यात तो कारागृहात होता. नुकताच जामिनावर सुटला अन्‌ त्याच्या नेतृत्वातील टोळीने शनिवारी (ता. ३१) भोकर स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा टाकल्याचे उघडकीस आले. शहरातील कालिंका माता मंदिराजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर १ जून २०२३ ला दिवसा सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेत दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकाच्या मांडीत चाकू खुपसला व पिस्तुलाच्या धाकावर ३ कोटी ६० लाख रुपयांचे सोने आणि १६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या गुन्ह्यात रायगड जिल्हा पोलिस दलात कार्यरत आणि तेव्हा लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेला उपनिरीक्षक शंकर रमेश जासक असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शालक या बँकेत सफाई कर्मचारी असल्याने त्याच्या माहितीवरून हा दरोडा पडल्याचे गुन्ह्यात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास पकडून आणले. गुन्ह्यात अटक झाल्यापासून तो जळगाव जिल्‍हा कारागृहात होता. नुकतेच सहा महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला आणि भोकर स्टेट बँक लुटीच्या गुन्ह्यात पुन्हा सापडला. कारागृहात बनली टोळी स्टेट बँक लुटीच्या गुन्ह्यातील फौजदार शंकर रमेश जासक गेल्या तीन वर्षांपासून कारागृहात होता. याच काळात त्याची खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गजानन राजेंद्र पवार (वय ३०) याच्याशी मैत्री झाली. दोघांनी कारागृहातच भोकर दरोड्याचा कट आखला. दीड महिन्यापूर्वी पवार बाहेर आल्यानंतर दोघांनी गावात रेकी केली. चादर विक्रेते बनून त्यांनी गावात फिरून माहिती घेतली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पवार दोन दिवसांपूर्वीही गावात येऊन गेला होता. असा झाला फौजदाराचा दरोडेखोर रायगड जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक असताना, तत्कालीन लाचलुचपत खात्यात कार्यरत किरणकुमार बकाले यांनी शंकर जासक याला लाच घेताना अटक केली होती. निलंबन काळात तो रजा टाकून जळगावात आला होता. त्याचा शालक कालिंका माता स्टेट बँकेत शिपाई होता. त्याच्या मदतीने १ जून २०२३ ला त्याने दरोडा टाकला. या गुन्ह्यात पकडला गेला. कारागृहात असताना, टोळी तयार करून त्याने भोकरचा दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकट अटकेतील संशयित असे शंकर रमेश जासक (वय ४२, रा. खेडी इस्कॉन मंदिराजवळ), गजानन राजेंद्र पवार (३२, न्याय डोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक ), अंकुश तुळशीराम चव्हाण (खापरखेडा), अंकुश श्रावण चव्हाण (रामदेव वाडी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.