नाशिक- तब्बल २१ वर्षानंतर अभिनेते सचिन खेडेकर यांचा ‘भूमिका’ नाटकाचा प्रयोग शनिवारी (ता.३) रात्री कालिदास कलामंदिरामध्ये झाला. परंतु, या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांना पाचशे रूपये तिकीट खर्चाबरोबर नाक दाबून स्वच्छतागृहांमधून येणाऱ्या असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागल्याने यावर नाटक रसिक व प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नूतनीकरणानंतर कालिदास कलामंदिराच्या कामाकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.