Nikhil Gotarane, Sahil Gotarane, Ganesh Gotarane and Mayuri Jadhav
sakal
नाशिक - गंगापूर धरणात गुरुवारी (ता. ११) दुपारी सव्वाचारच्या सुमारास तीन मुलगे व एक विवाहिता पाण्यात पोहताना बुडल्याची घटना घडली. या घटनेमुळे गंगापूर धरणालगत असलेल्या सावरगावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तीन जण चुलत भाऊ, तर विवाहिता ही त्यांची आतेबहीण होती. एक युवती बचावली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.