लग्नसराईमुळे फुलांचा ‘सुगंध’ वाढला

व्यावसायिकांना सुगीचे दिवस; बाजारपेठेत आवक वाढली
लग्नसराईमुळे फुलांचा ‘सुगंध’ वाढला
लग्नसराईमुळे फुलांचा ‘सुगंध’ वाढलाsakal
Updated on

मनमाड : गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा हाहाकार उडाल्याने सर्वत्र लग्नसमारंभ स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नाचा बार उडू लागला. मात्र, धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत पूर्ण होऊ शकला नाही. यंदा थांबलेल्या या वधू-वरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरवात झाली असून, लग्नसोहळ्याप्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून फुलांची आवक बाजारपेठेत वाढली असून, व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.तुळशी लग्नानंतर लग्नसराई सुरू होते. त्यामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. सुगंधी फुलांना मोठी मागणी आहे. शहरातील फुलांची दुकाने रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या फुलांनी सजली आहेत. सध्या लग्नसराईच्या काळात फुलांचे दर आकाशाला भिडले असून, वितभर गजऱ्यासाठी वीस ते तीस रुपये मोजण्याची वेळ आली आहे. मागणीच्या तुलनेत फुलांची आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येते. पावसाचा परिणाम फुलांच्या बागेवरसुद्धा झाला आहे. परिणामी, उत्पादन कमी झाल्याने दर वाढल्याचे मत फुलविक्रेते संतोष पवार यांनी सांगितले.

सध्या लग्नसराईची जोरदार धामधूम सुरू आहे. त्यासाठी मंगल कार्यालये हाउसफुल झाली आहेत. वधू-वरांसाठी आवश्यक असलेल्या वरमालेचे दरही वाढले आहेत. जादा सजावट करून वरमाला हवी असेल, तर त्या तुलनेत दरही वाढवले जातात. लग्नसराईमुळे जरबेरा, डच गुलाब, ऑकेर्ड, निशिगंध या फुलांना मागणी असून, विविधरंगी फुलांच्या गुच्छांच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लग्नासाठीच्या हार व गुच्छांच्या किमतीत तिपटीने वाढ झाली आहे. गुलाब, मोगरा, पिवळी शेवंती, निशिगंधा, गोल्डन, अस्तरा आदी फुले बाहेरून मागविली जातात.

वाहने सजावटीसाठीही फुलांचा वापर

लग्नसराईच्या हंगामात वाहन सजावटीपासून ते व्यासपीठ मंच सजविण्यासाठी फुलांचा वापर केला जातो. गाडीच्या दोन्ही बाजूंना दहा ते १५ माळा आणि बुके अशी गाडीची सजावट करण्यात येते. फुलांच्या किमतीत वाढ झाली असली, तरी त्याच्या मागणीतही त्याच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.

असे आहेत फुलांचे दर

गुलाब- १५० शेकडा, झेंडू- ५० रुपये प्रतिकिलो, शेवंती- १०० रुपये, गलांडा- ४० रुपये, निशिगंध- १५० रुपये, गुलाब बंडल- १०० रुपये, ऑर्केट- १०० रुपये, जरबेरा- १२० रुपये बंडल, लिली- ४० रुपये जुडी.

लग्न हार : ३५० ते पाच हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com