शनिवारी विनामूल्य मार्गदर्शन सत्र

शनिवारी विनामूल्य मार्गदर्शन सत्र
Published on: 
मँगो हॉलिडेजतर्फे युरोप पर्यटनासाठी शनिवारी विनामूल्य मार्गदर्शन सत्र ३२ वर्षांचा अनुभव; एक लाखाहून अधिक मराठी कुटुंबांचा विश्वास सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : पर्यटन क्षेत्रातील ३२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मँगो हॉलिडेजतर्फे युरोप पर्यटनासाठी इच्छुक असलेल्या नाशिककरांसाठी शनिवारी (ता. २१) विनामूल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाचला कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. मँगो हॉलिडेजचे संचालक मिलिंद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आतापर्यंत युरोपच्या २५९ यशस्वी सहली आयोजित केल्या असून, एक लाखाहून अधिक मराठी कुटुंबांचा विश्वास संपादन केला आहे. प्रीमियम विमानसेवा, दर्जेदार हॉटेल्स, उत्तम भारतीय भोजन, संपूर्ण स्थळदर्शन, पारदर्शक दररचना आणि अनुभवी टूर मॅनेजर ही संस्थेच्या सहलींची वैशिष्ट्ये आहेत. युरोपमधील पर्यटनस्थळांसोबतच तेथील भौगोलिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहितीही पर्यटकांना दिली जाते. या मार्गदर्शन सत्रात युरोपमधील पर्यटनस्थळे, चालण्याचे प्रमाण, तेथील हवामान, प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी, बाजारपेठेतील फसव्या जाहिरातींपासून बचाव, वैद्यकीय अडचणी आणि औषधोपचार याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. पर्यटकांच्या विविध शंकांचे निरसन करण्याची संधीही या वेळी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमानिमित्त मँगो हॉलिडेजतर्फे ‘ऑन द स्पॉट बंपर ऑफर्स’ही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे युरोप पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या नाशिककरांनी या विनामूल्य मार्गदर्शन सत्रासाठी नावनोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक मिलिंद बाबर यांनी केले आहे. --- चौकट कधी : शनिवार, ता. २१ नोव्हेंबर कुठे : गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक कधी : सायंकाळी ५ वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.