धुळे ः टुडे २ साठी, संक्षिप्त
---
फोटो क्रमांक ः 34941
धुळे ः नेत्रतपासणी शिबिरावेळी उपस्थित मान्यवर.
एबी फाउंडेशनतर्फे
नेत्रतपासणी शिबिर
धुळे ः शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात महापालिका आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकारातील एबी फाउंडेशनचे मोलाचे योगदान असून, असे सेवाभावी कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी काढले. महापालिका आणि एबी फाउंडेशनतर्फे तुलसी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने राऊळवाडी (मिल परिसर) येथील महापालिका रुग्णालयात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे हे चोवीस तास रुग्णांना मार्गदर्शन व उपचारांसाठी समन्वय साधून मोठी मदत करत असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेवक सुरेखा उगले, बंटी मासुळे, मनोज गर्दे, अतुल पाटील, शहर अभियंता रावसाहेब उगले, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे उपस्थित होते.
---
शुभांगी पाटील यांचे
शिक्षणमंत्र्यांना निवेदन
धुळे ः राज्यासह जिल्ह्यात २०२४- २०२५ नंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांची नावे पवित्र पोर्टल प्रणालीत समाविष्ट करावीत, अशी मागणी शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पवित्र पोर्टलवर २०२४ पर्यंतच्या टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र, त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणीचा टॅब बंद असल्याने ते पात्र असूनही शासकीय व खासगी शिक्षण संस्थांच्या सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीपासून वंचित राहत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत व्यथा मांडल्यानंतर पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. त्याची दखल घेत मंत्री भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
---
विविध वस्तूंचे
वृद्धाश्रमात वाटप
धुळे ः सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, जान्हवी शिंदे या दांपत्याने नगाव येथील अस्थिव्यंग दिव्यांग निवासी शाळा आणि आनंद विहार वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलांना पेटीकोट व पुरुषांना टोप्यांचे वाटप केले. ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा डॉ. सुलभा कुवर, उज्ज्वला पाटील, नूतन पाटील, वसंती पाटील, चंद्रकला पाटील, सीमा वाघ, तसेच नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, मुख्याध्यापिका शीतल भदाणे, शिक्षक उपस्थित होते.