मोफत तपासणी शिबीर

मोफत तपासणी शिबीर
Published on: 
धुळे : टुडे पान ४ साठी... -- फोटो क्रमांक : 34211 चिंरणे-कदाणे (ता. शिंदखेडा) : ‘सेवा सप्ताह’अंतर्गत झालेल्या आरोग्य शिबिरात तपासणी करताना डॉक्टर. शेजारी सत्यजित सिसोदे, पंकज कदम, मोतीलाल वाकडे, कुंतल पटेल, नितीन पाटील आदी. -- चिंरणे- कदाणे येथे शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी -- ‘सेवा सप्ताह’अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर; मोफत चष्मे वाटप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’अंतर्गत सत्यजित सिसोदे युवा प्रतिष्ठान, जिंदाल फाउंडेशन, जिंदाल पॉवर लिमिटेड आणि बडोदास्थित पारुल विद्यापीठाचे खेमदास रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने चिंरणे- कदाणे (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मोफत आयुर्वेद सर्व रोग निदान व उपचार शिबीर पार पडले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज कदम अध्यक्षस्थानी होते. शिंदखेडा तालुका भाजपचे अध्यक्ष मोतीलाल वाकडे उपस्थित होते. नरडाणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सत्यजित सिसोदे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. पारुल विद्यापीठाचे कुंतल पटेल, जिंदालचे नितीन पाटील, डॉ. साक्षी आरूजा, नयन सोनवणे, डॉ. भाईदास ठेलारी, महेश पाटील, कदाणेचे सरपंच रावसाहेब पाटील, निशानेचे सरपंच आबा पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रताप महाजन, निशानेचे माजी सरपंच गुलाब गिरासे, मगन लांडगे, संजय न्हावळदे, पाकळे, बाभुळदेचे माजी सरपंच पप्पू शिंदे, महाळपूरचे धनंजय निकम उपस्थित होते. शिबिरात सिकलसेल, मेडिसिन, पंचकर्म, सर्जरी, डोळे, नाक, कान, घसा, बालरोग विकारांवर उपचार करण्यात आले. पारुल विद्यापीठाच्या डॉ. आशिक मन्सूरी, डॉ. अभिलेश, डॉ. मेघा जाधव, डॉ. तन्मय राखेचा, डॉ. आदित्य शर्मा, डॉ. मुस्कान पटेल, डॉ. योगिता लबाना, डॉ. निकीता पाटील, डॉ. ऐश्वर्या पाटील, डॉ. मनिष पवार व डॉ. सिद्धार्थ वाघ यांनी आरोग्य तपासणी केली. प्रभाकर वाघ, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. विनोदकुमार कंखरे, प्रा. श्रीराम सिसोदे, चेतन सिसोदे, आनंद पवार, गणेश सोनवणे, राजेंद्र सिसोदे, एस. आर. पाटील, विशाल बोरसे, जितेंद्र भोपे यांनी सहकार्य केले. चिरणे, कदाणे, बाभुळदे, महाळपूर व निशाने गावांमधील ५०० रुग्णांनी लाभ घेतला असून, त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप झाले. अनिल काळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रवीण पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.