पान-२ मस्ट
YEO26B27151
येवला : जगदंबा मातेच्या यात्रेत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी युवा नेते कुणाल दराडे,ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमने व पदाधिकारी.
--------------
३६-२
तपासणी औषधोपचारांसह
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
कोटमगाव यात्रेत दराडे फाउंडेशनचे शिबिर
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१३ : कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या वार्षिक यात्रोत्सवात कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे सलग अकराव्या वर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घटी बसलेल्या भाविकांसह दर्शनाला येणाऱ्या भाविकांची ही मोफत तपासणी व औषध उपचार करण्यात येत आहे. या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सही लाभ रुग्णांना दिला जाणार आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे शिबिर संपूर्ण नऊ दिवस चोवीस तास सुरू राहणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. आवश्यकतेनुसार मोफत गोळ्या व औषधांचे वाटपही करण्यात येत आहे.
शिबिरात थंडी-ताप, मलेरिया, गॅस्ट्रोसह उपवासामुळे डोकेदुखी व पित्त या होणाऱ्या त्रासाची तपासणी करून जागेवर मोफत उपचार केले जात आहे. शिबिराचे विशेष वैशिष्ट्य़ म्हणजे गरजू वृद्ध आणि भाविकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे म्हणाले,‘ जगदंबा माता हे त्यांचे आराध्य दैवत आहे. २०१५ मध्ये सामाजिक कार्यात पदार्पण केले. तेव्हा याच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाकार्याची सुरुवात झाली. यात्रा उत्सवादरम्यान आमदार किशोर दराडे यांनी आरोग्य शिबिराला भेट देऊन पाहणी केली. जगदंबा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
----------------