पान-३--ॲंकर--५ कॉ फक्त
YEO26B27091
येवला : माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. शेफाली भुजबळ, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व पदाधिकारी.
----------------
मतदारसंघात नियमितपणे मोफत आरोग्य शिबिरे
डॉ. भुजबळ : येवल्यात वाढदिवसानिमित्त सर्वरोगनिदान शिबिरांचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१३ : सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच आजारांचे वेळीच निदान होऊन गरजू रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील सर्व गटांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे होणार आहेत. आरोग्यसेवेचा हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवण्यास प्राधान्य असेल, असे प्रतिपादन डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.
माजी खासदार समीर भुजबळ व मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भुजबळ ब्रिगेड येवला, मंत्री छगन भुजबळ यांचे वैद्यकीय मदत कक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एसएमबीटी रुग्णालयातर्फे आयोजित सर्वरोगनिदान शिबिराचे उद्घाटन डॉ. भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. सहभागी डॉक्टरांकडून ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी करून विविध उपचार करण्यात आले.
नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, गटनेते दीपक लोणारी, नगरसेविका पारुल गुजराथी, लक्ष्मीबाई साबळे, तृप्ती परदेशी, महेश काबरा, डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ. कमलेश पैठणकर, सचिन सोनवणे,मनोज पटेल, समन्वयक संतोष खैरनार आदी उपस्थित होते.
अनेकदा दैनंदिन धावपळ, आर्थिक अडचणी किंवा आरोग्याविषयी पुरेशी जागरूकता नसल्यामुळे आजारांचे निदान उशिरा होते. अशा स्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे नागरिकांसाठी उपयुक्त ठरतात. या माध्यमातून आजारांचे वेळीच निदान होण्यास मदत होते आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील सर्व गटांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवण्याचा मानस असल्याचे डॉ. शेफाली भुजबळ यांनी स्पष्ट केले. योगेश तक्ते, एसएमबीटी मेडिकलचे रवी भट, डॉ. देवाशीश इचे, डॉ. विक्रम कुलकर्णी, डॉ. रितू सपनार, डॉ. ऐश्वर्या चित्कार, डॉ. रेहा, डॉ. साक्षी कळमकर, डॉ. अजिंक्य पिंगळे, डॉ. शैलेश जिवाजी आदी उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघाचे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख संतोष खैरनार यांनी संयोजन केले.
--------------------