आज आरोग्य तपासणी शिबीर

आज आरोग्य तपासणी शिबीर
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... -- फागणे येथे आज मोफत आरोग्य तपासणी शिबीर -- श्री चिंतामणी हॉस्पिटलतर्फे नागरिकांसाठी उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : फागणे (ता. धुळे) येथे रविवारी (ता. १) सकाळी १० ते दोन दरम्यान मोफत रोगनिदान मार्गदर्शन व उपचार शिबिराचे होणार आहे. श्री चिंतामणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲन्ड क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने शिबिराचे आयोजन केले असून, बसस्थानकाजवळील श्री माणिक मंगल कार्यालयात शिबिर होईल. - या शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध असतील. यात ई.सी.जी., रक्तदाब, मधुमेह, बी.एम.आय., युरिक ॲसिड, एचबी, एलएफटी आणि कोलेस्ट्रॉल तपासणीचा समावेश आहे. तसेच, अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहविषयक आहार सल्ल्यासह मेडिकल बिलामध्ये सवलत मिळेल. शिबिरात अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, संधिवात, यकृत व किडनी विकार, मुळव्याध, भगंदर, फुफ्फुसाचे विकार, पॅरेलिसिस, फिट येणे, मायग्रेन, पचनाचे विकार, जुनाट हाडे व सांधे विकार, एएससिव्हीडी स्कोरद्वारे हृदय रोग व स्ट्रोकच्या १० वर्षांच्या जोखीमीचे निदान केले जाईल. शिबिरात तज्ज्ञ डॉ. वैभव राजू बडगुजर हे रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करतील. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.