जिल्हा रुग्णालयात २७० बालकांची तपासणी; ९ बालकांना मोफत शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात २७० बालकांची तपासणी; ९ बालकांना मोफत शस्त्रक्रिया
Published on: 
NSK26H33831 नाशिक ः जिल्हा रुग्णालयात बालकांची तपासणी करताना जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी. --------------- जिल्हा रुग्णालयात २७० बालकांची तपासणी ९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया, २६० बालकांना लवकरच मिळणार श्रवणयंत्रे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २७० बालकांची जिल्हा रुग्णालयात मोफत तपासणी करण्यात आली. तसेच ९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून २६० बालकांना लवकरच श्रवणयंत्रे दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची अंगणवाडी व शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून कर्णबधिर असलेल्या, तसेच श्रवणयंत्राची आवश्यकता असणाऱ्या बालकांसाठी पूर्वतपासणी शिबिर घेण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय आणि कर्ण हॉस्पिटल यांच्यातर्फे नुकतेच हे शिबिर झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार शिंपी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, नाक- कान- घसा तज्ज्ञ डॉ. योगेश्वरी मराठे, डॉ. परदेशी, डॉ. संदेश बागडी, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक दीपक चौधरी यांनी परिश्रम घेतले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.