मधुमेही बाल रुग्णांना मोफत इन्सुलिन किट व शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती

मधुमेही बाल रुग्णांना मोफत इन्सुलिन किट व शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती
Published on: 
फोटो : H34332 -------------- मधुमेही बालरुग्णांना मोफत इन्शुलिन किट शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती; दक्षता अभियानाचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : दिवाळीनिमित्त १२० मधुमेहग्रस्त बालरुग्णांना दोन महिन्यांचे तीन इन्शुलिन औषधाचे किट वाटप करून तसेच राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजच्या गरीब शेतकरी बांधवांच्या पंधरा विद्यार्थ्यांची एकूण सव्वा दोन लाखापर्यंतची फी भरण्यासाठी शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक मदत करण्याचा उपक्रम दक्षता अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात आला. नंदनवन लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भरत केळकर, माजी महापौर प्रकाश मते, राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रशांत पाटील, वरिष्ठ पत्रकार दीप्ती राऊत यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. केळकर यांनी दक्षता अभियान उपक्रमाचे कौतुक केले. दक्षता अभियानचे विक्रांत मते म्हणाले, दिवाळीनिमित्त होणाऱ्या खर्चातून गरजू व गरीब रुग्णांना मदतीचा हात देण्याची संकल्पना या उपक्रमाची आहे. मेडिकल कॉलेज येथे पूर्वी भाजी बँक, गोदावरी स्वच्छता मोहीम, कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन वाटप, गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप बँक उभारणे, आदी उपक्रम दक्षता अभियान राबवीत असून त्यांना सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा मते यांनी व्यक्त केली. या वेळी डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे पूर्वीची कॅन्सर सेवा देणाऱ्या बचतगटातील महिलांचा गौरव करण्यात आला. गायत्री डॉ. तुषार गोखले व डॉ. यशपाल गोगटे यांनी ग्रामीण भागातील व घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, अशा बालकांची निवड केली असल्याचे सांगितले. श्रीमती अनामिका यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दक्षता अभियानचे कार्याध्यक्ष शशिकांत टर्ले, अंबादास तांबे, प्रा.सोपान एरंडे, प्रताप देशमुख, मिलिंद कदम, बापू मानकर, प्रमोद सानप, रमेश मते आदींनी परिश्रम घेतले. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.