विद्यापीठात ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध

विद्यापीठात ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध
Published on: 
NSK26H33303 जळगाव : विद्यापीठातील ऑनलाइन कोर्सेसच्‍या माहितीपत्रकाचे विमोचनाप्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राजेंद्र नन्नवरे, ॲड. अमोल पाटील आदी. –––– विद्यापीठात ११ मोफत ऑनलाइन कोर्स माहितीपत्रकाचे विमोचन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कम्युनिकेटिव्ह इंग्लिशचे सहा आणि कॉम्प्युटर लिटरसीचे पाच असे ११ मोफत ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कोर्सेसच्या माहितीपत्रकाचे विमोचन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे, मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि सॉफ्ट स्किल्स अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कोर्सेसच्या माहितीपत्रकाचे विमोचनाप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. सुरेखा पालवे, अधिष्ठाता प्रा. जगदीश पाटील, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. उज्ज्वल पाटील, प्रा. रघुवंशी, इन्फोसिसच्या टीम लीडर ललिता भंगारे आणि विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या समन्वयिका प्रा. मधुलिका सोनवणे उपस्थित होत्या. यावेळी कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन मोफत कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. चौकट कोर्ससाठी वेबसाइटवरून नोंदणी विद्यापीठाच्या वेबसाइटवरून तसेच इन्फोसिस स्प्रिंगबोर्डच्या वेबसाइटवरून नोंदणी करून विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने हे कोर्सेस पूर्ण करू शकतात. कोर्स पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता आपली संवाद कौशल्ये आणि संगणकविषयक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. ––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com