नाशिक रोडमध्ये मोफत टँकर सेवा सुरू

नाशिक रोडमध्ये मोफत टँकर सेवा सुरू
Published on: 
फोटो CHE26B18104 नाशिक रोड : मोफत पाणी टँकर सेवेचा शुभारंभप्रसंगी राष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीणभाई तोगडिया, नगरसेवक कैलास मुदलियार, नितीन चिडे, विशाल कुलथे आदी नाशिक रोडमध्ये मोफत टँकर सेवा सुरू डॉ. तोगडिया यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. १३ : पाणीटंचाईच्या काळात नाशिकरोड परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने नगरसेवक तथा शिक्षण समितीचे सदस्य कैलास मुदलियार यांच्या पुढाकारातून मोफत पाणी टँकर सेवा सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, प्रभागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या काळात विनामूल्य पाणी उपलब्ध करून देण्याचा यामागील उद्देश आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी करण्याबरोबरच गरजू कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या वेळी नगरसेवक कैलास मुदलियार, शिवसेना नेते विजय करंजकर, गोपाल लाल, विशाल कुलथे, रणजितसिंग आनंद, मोहन चौहान, नितीन चिडे, विनय उपाध्याय, लकी ढोकणे आदी उपस्थित होते. डॉ. तोगडिया यांचे कैलास मुदलियार व पदाधिकाऱ्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून नागरिकांच्या गरजेला प्राधान्य देत सुरू केलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. शुभारंभप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.