
Nashik News : स्वातंत्र्य सेनानी, कॉम्रेड कुसुमताई गायकवाड यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन
मनमाड (जि. नाशिक) : स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड यांचे आज मनमाड येथे निधन झाले. त्या ९७ वयाच्या होत्या. स्वातंत्र्य सैनिक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जेष्ठ नेत्या होत्या. (Freedom fighter Comrade Kusumtai Gaikwad passed away at age of 97 Nashik News)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कुसुमताई गायकवाड या ९७ वर्षाच्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या पत्नी होत. बाबूजी हयात नसले तरी त्यांच्या चळवळीचा, लढ्याच्या अनेक आठवणींचा खजिना त्यांच्या जवळ होताच परंतु त्यांनी देखील त्या चळवळीत प्रत्येक सहभाग घेत होता.
भाकप नेते कॉ. माधवराव गायकवाड यांना त्यांनी आयूष्यभर साथ दिली. संयुक्त महाराष्ट्र लढा, खंडकरी शेतकरी, सहकार, नगर पालिका, रेल्वे आशा विविध चळवळीत ७५ वर्ष योगदान देणाऱ्या कॉम्रेड माधवराव गायकवाड (बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य त्यांनी नेटाने पुढे नेले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी साधना गायकवाड या आहेत.