यादवकालीन राजेरजवाड्यांचा इतिहास, ब्रिटिशकालीन हातमागाची पेठ, विडी उद्योगाचा उदय, सहकारी औद्योगिक वसाहतीचा आणि पाठोपाठ माळेगाव एमआयडीसीसह औद्योगिकीकरणाचा झालेला आरंभ, इंडियाबुल्सचा सेझ प्रकल्प हे सिन्नरच्या विकासाचे प्रमुख टप्पे म्हणता येतील. त्यात नव्याने आगमन होताना काही गोष्टी कालबाह्य होणे, हा निसर्गनियम झाला.