नासाका ऊस उत्पादकांना एफआरपीची ५० टक्के रक्कम, उर्वरित ५० टक्के ७ डिसेंबरला

नासाका ऊस उत्पादकांना एफआरपीची ५० टक्के रक्कम, उर्वरित ५० टक्के ७ डिसेंबरला
Published on: 
गोडसेंकडून एफआरपीची ५० टक्के रक्कम अदा उर्वरित रक्कम ७ डिसेंबरला देणार ः नासाकाच्या शेतकऱ्यांना दिलासा सकाळ वृत्तसेवा नाशिकरोड, ता. ८ : नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) संचलित अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेडला २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. थकीत एफआरपीच्या १ कोटी १६ लाख रुपयांपैकी ५८ लाख रुपये (५० टक्के) माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून गुरुवारी (ता. ६) शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली. उर्वरित ५८ लाख रुपये ७ डिसेंबरला देण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी जाहीर केले. -------------- मागील गळीत हंगामात कारखाना पुण्यातील राजगंगा कंपनीने चालविला होता. ऊसदर आणि गळीत हंगामाचा खर्च कंपनीचे मालक प्रसाद घावटे यांनी करणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांचे ऊसबिल थकल्याने उत्पादक अडचणीत आले होते. याबाबत शिष्टमंडळाने माजी खासदार गोडसे यांच्याकडे पाठपुरावा केला. गोडसे यांनी शेतकऱ्यांसमवेत धाराशिव, शिरूर आणि पुणे येथील कंपनीच्या कार्यालयांना भेट देऊन थकीत रकमेबाबत विचारणा केली. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही पैसे अदा झाले नसल्याने त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांप्रती बांधिलकी म्हणून स्वखर्चातून एफआरपीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. श्री. घावटे यांनी मान्य केल्याप्रमाणे उर्वरित ३० टक्के रक्कम वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ धाराशिव येथील कारखाना व कार्यालयात जाणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व आपण स्वतः करणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. १६-१ इतर थकबाकीसाठी न्यायालयात कारखान्याचे विविध पुरवठादार, व्हेंडर्स, कर्मचारी वेतन आणि अन्य देणी अद्याप प्रलंबित आहेत. या रकमांच्या वसुलीसाठी घावटे आणि कदम यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागितल्याचे गोडसे यांनी सांगितले. कारखाना सुरक्षित राहावा यासाठी सुरक्षारक्षकांची जबाबदारीही घेतली असून, अन्य देणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.