फळबागांना विमा कवच

फळबागांना विमा कवच
Published on: 
धुळे : टुडे पान १ साठी.. अँकर -- हवामान बदलाच्या संकटात फळबागांना विमा कवच -- जिल्ह्यात आंबिया बहार २०२६-२७ साठी पुनर्रचित विमा योजनेला सुरुवात सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : जिल्ह्यात आंबिया बहार २०२६- २७ साठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे आंबा, केळी, डाळिंब आणि पपई या प्रमुख फळपिकांना विविध हवामान धोक्यांपासून आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी केले आहे. कधी अवेळी पाऊस, कधी तापमानातील अचानक बदल तर कधी अतिवृष्टी किंवा वेगवान वारा यामुळे जिल्ह्यातील फळबागांचे अतोनात नुकसान होते. फळपिकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी आर्थिक गुंतवणूक असते. अपेक्षित उत्पादन हाती न आल्यास संपूर्ण हंगामाचे आर्थिक गणित बिघडते. या अनिश्चित जोखमींना भक्कम आधार देण्यासाठी राज्य शासनामार्फत ही योजना वरदान ठरत आहे. - आंबिया बहार २०२६- २७ अंतर्गत अधिसूचित फळपिकांसाठी पिकनिहाय हवामान धोके, विमा संरक्षणाचा कालावधी आणि विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे. आंब्यासाठी सहा हजार ८०० रुपये हप्ता भरल्यास एक लाख ७० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच, गारपीट संरक्षणासाठी दोन हजार ८५० रुपये हप्त्यावर ५७ हजार रुपयांचे संरक्षण उपलब्ध असून, यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. केळी पिकासाठी आठ हजार ५०० रुपये हप्ता भरल्यास एक लाख ७० हजार रुपयांचे कवच मिळणार असून ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. डाळिंब पिकासाठी सहा हजार ४०० रुपये हप्ता भरल्यास एक लाख ६० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असून, गारपीटसाठी दोन हजार ६५० रुपये हप्त्यावर ५३ हजार रुपयांचे संरक्षण आहे. यासाठी १४ जानेवारी २०२७ पर्यंत मुदत आहे. पपई पिकासाठी तीन हजार ४०० रुपये हप्ता भरल्यास ४० हजार रुपयांचे संरक्षण उपलब्ध आहे आणि गारपीटसाठी ६५० रुपये हप्त्यावर १३ हजार रुपयांचे संरक्षण मिळणार असून, ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ मुदतीपूर्वी अर्ज करा या योजनेअंतर्गत महसूल मंडळ हा विमा घटक निश्चित करण्यात आला असून संबंधित अधिसूचित मंडळातील पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. हवामानातील अनिश्चितता रोखता येत नसली तरी त्यातून उद्भवणारी आर्थिक जोखीम निश्चितच कमी करता येते. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com